Opportunities  
  Appointments >  
CEE has two types of appointments – Regular and Project. Regular appointments of scientific and administrative staff are done through national advertisements and tests. Advertisements appear in major national dailies as well as on this website. The successful candidates work with any of the Groups, as well as move among Groups.
Project appointments are short term recruitments to meet the needs of specific projects.

पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे कडून महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पांतर्गत शिक्षण आणि माहिती व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रकल्प समन्वयक आणि प्रकल्प अधिकारी पद भरती

पर्यावरण शिक्षण केंद्र (सी.ई.ई.CEE) हे भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे पर्यावरण शिक्षणातील ‘राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र’ आहे. (अधिक माहितीसाठी पहा: www.ceeindia.org)      

महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग समर्थित पाच वर्षांच्या या प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शेती पिकं वाण विविधता & जनावरांच्या स्थानिक जाती संवर्धन, गवताळ प्रदेशातील जैव विविधता, गोड्या पाण्यातील जैव विविधता, परिसर पुनर्निर्माण आणि खारफुटी वने संवर्धन या विषयावर विविध संस्था/समूहातर्फे समुदाय आधारित प्रकल्प राबवण्यात येत आहेत. पर्यावरण शिक्षण केंद्र या विषयांशी निगडीत स्थानिक शाळा आणि समुदाय यांच्या बरोबर शिक्षण आणि माहिती व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवीत आहे. या अंतर्गत खालील प्रमुख उपक्रम राबवले जाणे अपेक्षित आहे –

१.      सहभागी पद्धतीने विषयवार शिक्षण उपक्रम निश्चिती

२.      शैक्षणिक साधन-सामुग्री विकसन

३.      शिक्षक आणि स्थानिक पर्यावरण शिक्षण मित्र यांचे प्रशिक्षण

४.      माहितीच्या दुहेरी देवाण घेवाणीसाठी ‘विकी’ सारखी वेब साईट आधारित व्यवस्था उभारणीमधे भागीदारी

५.      राज्यातील शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जैव विविधता शिक्षणाचा प्रभावी अंतर्भाव होण्यासाठी प्रयत्न करणे     

या प्रकल्पासाठी खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

१.      प्रकल्प समन्वयक - Project Coordinator  (पद - १)

पगार: रु.२४०००/- दरमहा (मुल्यांकनाधारित वार्षिक वाढ) 

कामाचे स्वरूप: प्रधान शोधकर्ता (PIPrincipal Investigator) च्या मार्गदर्शनानुसार प्रकल्प नियोजन, उपक्रम & आर्थिक व्यवस्थापन, अंमलबजावणी आणि अहवाल निर्मिती ई.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयातील पदव्युत्तर, किमान ३ वर्षे पर्यावरण शिक्षण, जैव विविधता आणि निगडीत विषयामध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

गुण & कौशल्ये: जैव विविधता आणि शिक्षण दोन्हींची समज आणि आवड, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा उत्तम प्रकारे बोलता, लिहिता येणें आवश्यक. टीम व्यवस्थापन कौशल्ये, प्रवासाची आवड. स्थानिक समुदायांबरोबर, संस्थांबरोबर प्रभावीपणे काम करण्याची योग्यता. कंप्युटर प्रभावीपणे वापरणे. पाच वर्षे काम करण्याची तयारी. 

 

२.      प्रकल्प अधिकारी - Project Officer (पद - २)                

पगार: रु. १७५००/- दरमहा (मुल्यांकनाधारित वार्षिक वाढ)

कामाचे स्वरूप: सहभागी शिक्षण उपक्रम & साधनांची निर्मिती, प्रशिक्षण कार्यशाळा राबवणे, स्थानिक संस्थेशी, शाळांशी समन्वय ठेवणे, अहवाल लेखन सहाय्य ई. 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयातील पदवीधर+संबंधित कामाचा अनुभव/पदव्युत्तर

गुण & कौशल्ये: जैव विविधता आणि शिक्षण दोन्हींची समज आणि आवड, मराठी उत्तम प्रकारे बोलता, लिहिता येणें, इंग्रजीचे किमान कामचलाऊ ज्ञान आवश्यक. प्रवासाची आवड, शाळा आणि समुदाय यांच्या बरोबर काम करण्याची आवड व तयारी. कंप्युटर प्रभावीपणे वापरणे. पाच वर्षे काम करण्याची तयारी.      

 

अर्ज पाठवायची अंतिम मुदत: आठ दिवस अर्ज पाठवण्यासाठी इमेल करा: mgb@ceeindia.org

CEE also has a databank of candidates who have evinced interest in applying for a post in CEE. If you are interested, please send in your biodata to jobapplication@ceeindia.org.
Share